दहशतीच्या छायेत... एका काश्मिरी मुलीची कैफियत!
आम्हाला सर्वसामान्य माणसांसारखं आयुष्य जगायचं आहे. आमचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित आहेत आणि वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि याचे परिणाम फक्त सामान्य लोकांनाच सोसावे लागतात. हे सगळं कधी ठीक होईल? काश्मिरी लोकांना एक सर्वसाधारण, नॉर्मल आयुष्य कधी जगता येईल? हे सर्व प्रश्न मनात सलत राहतात. या विचारानं रात्री मध्येच केव्हा तरी जाग येते. त्यानंतर मी झोपूच शकत नाही.......